कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेत राज्यात दहावी आणि बारावी परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यावेळी फेब्रुवारी आणी मार्च या नियोजित महिन्यात परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
यावेळी बारावीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होईल. दहावीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 20201 या कालावधीत होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. मुंबई सह कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागात एकाचवेळी परिक्षा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील 16 फेब्रुवारी 2021 पासून नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. अभ्यासाचे नियोजन विद्यार्थ्यांना सोयीचे होण्यासाठी एप्रिल व मे महिन्यातील लेखी परिक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.