महिलांच्या पर्स व मोबाईल हिसकावणारे जेरबंद

आरोपी वासुदेव संतोष राजपुत

आारेोपी दीपसिंग राजपूत

जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून एकट्या दुकट्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत, पर्स व मोबाईल हिसकावून मोटार सायकलद्वारे पळून जाण्याच्या घटना सुरु आहेत. या घटना लक्षात घेता एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी पो.नि. विठ्ठल ससे यांनी डी.बी.पथकातील कर्मचा-यांन तपास करण्यास सांगितले होते.

त्या अनुशंगाने पेट्रोलिंग दरम्यान सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.कॉ. जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील व असिम तडवी घटनांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान 2 जुलै रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास दुचाकीने भरधाव वेगातील दोन तरुण त्यांना संशयास्पद वाटले. पथकातील आनंदसिंग पाटील व सहका-यांनी त्यांना अडवले.

त्यावेळी त्यांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांची अंगझडती घेता त्यांच्या ताब्यातून शहरातिल विविध ठिकाणी महिलांकडून हिसकावलेले मोबाईल, एटीएम कार्ड आदी एवज मिळून आला.

राजेश दिपसिंग राजपूत व वासुदेव संतोष राजपूत अशी त्या चोरट्यांची नावे निष्पन्न झाली.  या दोघांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड. बारगजे तर आरोपींकडून अ‍ॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here