पुणे : समीर गायकवाड या बावीस वर्षाच्या प्रसिद्ध टिकटॉक स्टारने पुणे येथे रविवारी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्रेम संबंधातून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. वाघोली भागातील निकासा सोसायटीतील घरात पंख्याला साडीचा गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलिस स्टेशनला खबर दिली. शॉर्ट आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून तो तरुणांसाठी आयकॉन झाला होता.