पेंटरच्या परिवारास युनियने केली दहा हजाराची मदत

जळगाव : पेंटरकाम करणा-या तरुणाचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्याच्या परिवारावर कोसळलेल्या दुखा:ची तिव्रता कमी करण्याचे काम हिंदु मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर युनियनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पारोळा येथील सुभाष रमेश भोई या रंगकाम करणा-या पेंटरचे 8 फेब्रुवारी रोजी वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. सुभाष भोई याच्या निधनाने त्याच्या परिवारावर मोठे संकट कोसळले होते. भोई परिवारावर कोसळलेल्या दुखा:ची तिव्रता कमी करण्यासाठी हिंदु मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर युनीयनने पुढाकार घेतला. युनीयनच्या माध्यमातून या परिवारास दहा हजार रुपयांच्या फिक्स डिपॉजीटची मदत करण्यात आली. शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आलेल्या या मदतीने पेंटर व्यावसायीकांमधे एक आदर्श निर्माण झाला आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, उपाध्यक्ष कृष्णा सपकाळे, खजीनदार मंगलसिंग जाधव, पारोळा शाखा अध्यक्ष रवी जाधव, उपाध्यक्ष इस्माईल भाई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here