मुंबईच्या हॉटेलात खासदाराचा मृतदेह

मुंबई : मुंबई मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलात दमण व दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हा आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खा. मोहन डेलकर यांच्या मृतदेहाजवळ गुजराथी भाषेतील पत्र आढळून आले आहे.

दादरा नगर हवेली मतदारसंघाचे मोहन डेलकर हे खासदार आहेत. सन 1989 पासून ते लोकसभेसाठी निवडून आले आहेत. सलग सात वेळा खासदारकीची निवडणूक लढवणा-या मोहन डेलकर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here