जळगाव : आर.के. पटेल अँण्ड कंपनी, टोबॅको प्रोसेसर, अमळनेर या कंपनीच्या बनावट तंबाखूचा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा बनावट माल आज जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जप्त केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सनी टेकचंद पंजाबी (32) रा. झुलेलाल मंदीराजवळ, सिंधी कॉलनी पाचोरा यास ताब्यात घेण्यात आले आहे. पिकअप वाहनाने सदर बनावट आर.के.पटेल कंपनी या नावाचा वापर केलेल्या तंबाखूचा साठा वाहून नेत असतांना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी कंपनीच्या वतीने अशोक बाबुराव महाजन अमळनेर यांनी रितसर फिर्याद एमआयडीसी पोलिसात दाखल केली आहे.पुढील तपास पो.नि.विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.