दहावी, बारावी परिक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

सर्वत्र कोरोनाचे सावट पुन्हा एकदा पुढे आले आहे. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परिक्षार्थींमधे काळजीचे वातावरण पसरले होते. अखेर शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाकडून सुचना मागवल्या होत्या. त्या सुचनांवर विचारविनीमय केल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोविड संबंधीत नियमांचे पालन करुनच परिक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. तसे राज्य शिक्षण मंडळाने घोषित केले आहे. बारावीची लेखी परिक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकुण नऊ विभागीय मंडळाकडून या परिक्षा घेतल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here