जळगाव : आज दुपारी शहरातील पंचमुखी हनुमान परिसरातून दुचाकीस्वाराकडून पंधरा लाख रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात दोघे जण यशस्वी होण्याची थरारक घटना घडली. दरम्यान या घटनेने परिसरात दुपारच्या वेळी खळबळ माजली होती.
महेश चंद्रमोहन भावसार आणि संजय सुधाकर विभांडीक हे दोघे जण दुचाकीने दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातून जात होते. यापैकी महेश भावसार यांच्याकडे पंधरा लाख रुपयांची रोकड होती. दरम्यान दोघे जण दुचाकीने त्यांच्याजवळ आले. आलेल्या दोघा जणांनी सोबत रोकड असलेल्या महेश भावसार यांना थांबवत त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी हिमतीने त्यास प्रतिकार सुरु केला. बॅग हिसकावण्यात अपयश येत असल्याचे बघून एकाने रिव्हाल्व्हरच्या धाकावर भावसार यांना धमकावण्यास सुरुवात केली. या झटापटीत रिव्हालव्हर मधील मॅगेजीन रस्त्यावर पडली.
हे देखील वाचा – मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या ताब्यात
मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या ताब्यात
जास्त वेळ घालवणे योग्य नसल्याचे बघून पुर्ण ताकदीनिशी एकाने रोकड असलेली बॅग घेवून एकट्यानेच दुचाकीने पळ काढला. त्यात एक हल्लेखोर दुचाकीच्या खालीच राहून गेला. त्याने तशाच अवस्थेत धावत घटनास्थळावरुन पळ काढला. तो देखील पळून जाण्यात यशस्वी झाला. भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. आपण ही रोकड बॅंकेत भरणा करण्यासाठी जात असल्याचे संजय विभांडीक यांनी म्हटले आहे. घटनेची माहीती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पुढील तपासकामी पावले उचलण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांची नावे निष्पन्न झाल्याचे समजते. यातील एकाचे नाव विक्की आणि दुस-याचे खुशाल असल्याचे समजते. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
हे द्खील वाचा – चोरीच्या दुचाकीसह चोरटा एलसीबीच्या ताब्यात
चोरीच्या दुचाकीसह चोरटा एलसीबीच्या ताब्यात