बुलेटराजांची बुलेटगिरी वाहतुक शाखेत जमा

जळगाव : बुलेटला कर्णकर्कश आवाजातील सायलेंसर बसवून सार्वजनीक ध्वनीप्रदुषण करणा-या बुलेटस्वारांवर शहर वाहतुक शाखेने दंडात्मक कारवाई करुन कायद्याचा बडगा उगारला आहे. आज जळगाव शहर वाहतुक शाखेने एकुण तेरा बुलेटवर कारवाई करुन त्यांच्याकडून 18 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. अशीच कारवाई सातत्याने सुरु राहणार असल्याचे पो.नि.देवीदास कुनगर यांनी म्हटले आहे.

शहरातील बुलेट चालक व मालक हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सुसाट वेगाने आपल्या ताब्यातील बुलेट चालवत असल्याचे वेळोवेळी आढळून आल्याची दखल शहर वाहतुक शाखेने घेतली होती. बहुतांश बुलेट चालक व मालक हे कंपनीने दिलेले सायलेंसर बदलून त्याजागी कर्कश आवाजाचे सायलेंसर लावत असतात. ढोलकी, पंजाब, डॉलफीन अशा विविध नावांनी हे सायलेंसर ओळखले जातात. कारवाई दरम्यान शहर वाहतुक शाखेतर्फे वाहनांना लावण्यात आलेले मॉडीफाईड सायलेंसर काढून त्याजागी कंपनीने दिलेले मुळ सायलेंसर लावण्यात आले आहेत. मॉडीफाईड सायलेंसर शहर वाहतुक शाखेत जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर वाहतुक शाखेचे पो.नि. देवीदास कुनगर यांच्यासह पोलिस उप निरीक्षक कैलाससिंग पाटील व कर्मचारी वर्गाने या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईमुळे बुलेट चालकांमधे घबराट पसरली असून अनेकांनी कारवाईच्या भितीपोटी आपल्या बुलेटला मुळ सायलेंसर बसवून घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here