संभाजी देवरे यांची उ.म. वेबपोर्टल सोशल मिडीया प्रमुखपदी निवड

जळगाव : भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांच्या आदेशाने अमळनेर येथील लोक न्युज या वेबपोर्टलचे संपादक संभाजी देवरे यांची उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाली आहे. संभाजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण निहाय वेबपोर्टल सोशल मीडिया संघटन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जळगाव येथील पत्रकार नरेंद्र कदम (मोबाईल इंडिया न्युज), ललित खरे(क्राईम दुनिया), नरडणा शिदखेडा येथील पत्रकार भालचंद्र पाटील(सुजाण नागरीक), शिदखेडा तालुक्यातील पत्रकार विनायक पवार (शिदखेडा वैभव), अमळनेर तालुक्याचे पत्रकार ईश्वर महाजन (मराठी लाईव्ह), नवापूर तालुक्याचे पत्रकार सुधीर निकम (नवापूर एक्सप्रेस), धरणगाव तालुक्याचे पत्रकार किरण चव्हाण (लोक पत्रिका), नंदुरबार जिल्ह्याचे पत्रकार शैलेंद्र चौधरी (जय मल्हार न्यूज), अमळनेर तालुक्याचे पत्रकार विनोद पाटील (एम न्यूज), एरंडोल तालुक्याचे पत्रकार विक्की खोकरे (लोकराज्य न्यूज), पाचोरा तालुक्याचे पत्रकार शिवाजी शिंदे (ग्लोबल महाराष्ट्र न्युज), अमळनेर तालुक्यातील पत्रकार श्यामकांत पाटील (मराठी ब्रेकिंग न्यूज), अमळनेर तालुक्याचे पत्रकार महेंद्र पाटील (लोकमत प्रेसफोटो ग्राफर), जळगाव येथील पत्रकार मोरेश्वर सुरवाडे (लोकशासन ) ,यांची संघटनेत संभाजी देवरे यांनी निवड केली आहे. तसेच वेब पोर्टल सल्लागार प्रमुख म्हणून अ‍ॅड. सलीम खान(अमळनेर), अ‍ॅड.विजय पाटील(धरणगाव), अ‍ॅड. मिलींद सोनवणे (शिंदखेडा), अ‍ॅड. ज्योत्सना पारधी (शिंदखेडा), अ‍ॅड.प्रविण पाटील जळगाव यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य ही संघटना संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे. उत्तर मराष्ट्रात  संभाजी देवरे यांच्या कार्यशैलीने सदर संघटना निश्चीतच नावारुपाला येईल अशा प्रतिक्रिया वेबपोर्टल वर्तुळात उमटत आहेत.  संभाजी देवरे यांच्या यशस्वी पत्रकारिते मुळे उत्तर महराष्ट्रात ही संघटना उदयास आलेल्या वेबपोर्टल पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावेल यात तीळमात्र शंका नाही. संपादक संभाजी देवरे यांनी आतापर्यंत विविध संघटनांमधे कार्य केले आहे. पत्रकारांच्या अनेक संघटना त्यांनी अमळनेर मध्ये स्थापन करुन वाढवल्या आहेत. तसेच त्यांनी तळमळीने कार्य करणाऱ्या पत्रकारांची फळी देखील निर्माण केली आहे. अमळनेर तालुक्यात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार, संघ,महाराष्ट्र राज्य,  मराठी पत्रकार संघ, वेब पोर्टल असोसिएशन मुंबई या संघटनांचे रोपटे त्यांनी लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here