जळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत , शहरातील “दि आर्किटेक्ट” या आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांच्या नामांकित फर्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना व्यावसायिक मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या महिला आर्किटेक्टनां व्यावसायिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “दि वूमन आर्किटेक्ट कलेटिव्ह” या मंचची आज स्थापना करण्यात आली. “बेटी बचाओ बेटी पढाओ”चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके आणि काउंसिल ऑफ आर्किटेक्चर चे राष्ट्रीय अध्यक्ष आर्कीटेक्ट हबीब खान यांच्या उपस्थितीत या मंचचे औपचारिक उदघाटन करण्यात आले.
आज या शुभारंभ दिनी जळगाव शहरातील 12 महिला आर्किटेक्टची निवड करण्यात आली असून या मंचच्या माध्यमातून तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, आत्मविश्वास मिळवून देणे, व्यावसायिक कामे मिळवून देणे आणि ही कामे मिळण्यासाठी सहाय्य भूत ठरणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्र्या सक्षम करणे या मुख्य उद्देशाने या मंचची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी 13000 पेक्षा जास्त मुली आर्किटेक्ट होतात पण प्रत्यक्षात 35 टक्के मुलीही या व्यवसायात सहभागी होत नाही, शिक्षणानंतर सांसारिक जबाबदारी आल्यावर या मुलींना त्यांच्या व्यवसायास वेळ देता येत नाही त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो, स्वतःची फर्म सुरू करता येत नाही आणि उच्च विद्या विभूषित असुनही कामे मिळत नाही त्यामुळे या मुलींची कोंडी होऊ लागते. आज देशात दीड लाख आर्किटेक्ट पैकी अंदाजे 70000 महिला आर्किटेक्ट पैकी 65% म्हणजेच सुमारे 45000 महिला आर्किटेक्ट या विविध कारणाने आपल्या मूळ व्यवसायाच्या बाहेर आहेत ही खूप मोठी आहे आणि यामुळे मोठे मनुष्यबळ ही वाया जाते आहे ,या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शिरीष बर्वे यांनी या मंच ची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, आज या कार्यक्रमात डॉ राजेंद्र फडके यांनी प्रत्यक्ष तर हबीब खान यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले आणि उपक्रमास जैन इरिगेशन चे अध्यक्ष श्री अशोक जैन,नागपूर हून डॉ उज्वला चक्रदेव, पुण्याहून डॉ पूर्वा केसकर व रायपूर हून प्राध्यापक विद्या सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आर्किटेक्ट असोशिअन चे जळगाव शहर अध्यक्ष आर्किटेक्ट किशोर चोपडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. छोटेखानी कार्यक्रमात जळगावातील मंचाच्या सदस्या आर्किटेक्ट महिलांच्या वतीने आर्किटेक्ट अंकिता शिंपी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. इतर आर्किटेक्ट महिलांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास दि आर्किटेक्ट चे सर्व सहकारी उपस्थित होते.