मुंबई : मुंबईसह ठाण्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. मुंबईच्या नाईट क्लबमुळे कोरोना व सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे मुंबईतील नाईट क्लब बंद होण्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांना विधानभवनात बोलतांना दिले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत त्याठिकाणी गरजेनुसार लॉकडाऊन व संचारबंदीचे निर्बंध लादले जातील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत म्हटले होते. मुंबईसह ठाणे येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणेचे त्यावर लक्ष आहे. लोकलसह बेस्ट बसेसमधील गर्दीवर देखील या बैठकीत चर्चा झाली. राज्यात ज्या ठिकाणी गर्दी होते त्याठिकाणी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी निर्बंध लावतील. मात्र असे असले तरी लॉकडाऊन हा त्यावरील उपाय नाही असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.