मुंबई : आता माझ्याकडे जिवनाची सतरा वर्ष देखील नाहीत. ना नोकरी ना जगण्याची अपेक्षा….. जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे. असे सचिन वाझे यांनी स्टेटसच्या माध्यमातून केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. आपल्या स्टेटसमधे स.पो.नि. सचिन वाझे यांनी म्हटले आहे की आताच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. सतरा वर्षात माझ्याकडे अपेक्षा, सहनशिलता, आयुष्य आणि नोकरी होती. आता माझ्याकडे जिवनाची सतरा वर्ष देखील नाही. आता मला ना नोकरी ना जगण्याची अपेक्षा असे म्हणत जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत असल्याचे विधान सचिन वाझे यांनी केले आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या संकटात सापडलेले स.पो.नि.सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकाने सलग दहा तास चौकशी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकासह धमकीचे पत्र असलेले वाहन सापडले होते. या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे होता. या वाहन मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून वाझे संशयाच्या गराड्यात सापडले आहेत.
3 मार्च 2004 रोजी सीआयडीच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्याला एका खोट्या प्रकरणात अडकवले होते. त्यावेळी आपल्याला अटक झाली होती. ती अटक अयोग्य आहे. या इतिहासाची जाणीव मला होत आहे. आपल्याला आपले सहकारी चुकीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा स.पो.नि. सचिन वाझे यांनी व्हाटस अॅप स्टेटसच्या माध्यमातून केला आहे.