मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास देखील एटीस कडून एनआयए कडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकाचा तपास एनआयए करत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ चोरीचा तपास एटीएस करत आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास देखील आता एनआयए कडे सोपवला जाण्याची चिन्हे दिसून येत आहे. स.पो.नि. सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासात गती आली आहे. या तिन्ही प्रकरणात स.पो.नि. सचिन वाझे यांची भुमिका दिसुन येत असल्याचे म्हटले जात आहे. या तिन्ही प्रकरणांचा तपास एनआयए कडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी वापरण्यात आलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट बनावट असल्याचे उघड झाले आहे. या बनावट नंबर प्लेट कुणी तयार केल्या याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सीआययु युनीट मधील चार अधिका-यांची रविवारी चौकशी झाली. यापैकी एका अधिका-याची सलग नऊ तास चौकशी झाली.