यावल ( प्रतिनिधी ) : पवित्र धर्मग्रंथ कुरानच्या आयात वगळण्यात येण्याची मागणी असलेली याचीका उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बॉर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदर याचिका सर्वाच्च न्यायलयाने फेटाळण्याची मागणी यावल येथील मुस्लीम युवकांच्या वतीने करण्यात आली आहे. यावल शहर मुस्लीम समाज युवकांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, वसीम रिजवी यांनी केलेले कुरान बाबतचे वक्तव्य हे समाज माध्यमातून सर्वत्र पसरले आहे. या प्रकारामुळे देशातील मुस्लीम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. ईस्लाम धर्माबाबत गैरवक्तव्य आणि अपप्रचार केला जात असून याप्रकरणी वसीम रिझवी यांच्याविरुद्ध भा.द.वि. 295 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अजहर शेख , कदीर खान नसीर खान, तौसीफ शेख नजमोद्दीन, अल्ताफ शेख समद, पप्पु बिल्डर, जावीद शेख, आसीफ शेख, अनिल जंजाळे, नगरसेवक अस्लम शेख नबी, जहीर खान, आसिफ शेख शरीफ आणी ईमरान पहेलवान यांच्या सह्या आहेत.