गृहरक्षक दलाचा कारभार हाती घेण्यापुर्वीच रजेवर गेलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट दिले होते असा आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गंभीर आरोपामुळे रा. कॉ. सुप्रिमो शरद पवार निर्णय घेण्याच्या पातळीवर आले असल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रा.कॉ.च्या प्रमुख नेत्यांची सायंकाळी पाच वाजता बैठक होत आहे. या बैठकीस उप मुख्यमंत्री अजित पवार, रा.कॉ. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी हजर राहणार आहे. यावेळी गृहमंत्री बदलाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय परमबीर सिंह यांच्या आरोपातील सत्यतेबाबत चर्चा केली जाणार आहे.