मुंबई : मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने दोघा संशयीतांना अटक केली आहे. या दोघांचा या मृत्यूप्रकरणी हात असल्याचा दावा केला जात आहे. मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास कालच एनआयए कडे देण्यात आला आहे. एटीएसने अटक करण्यात आलेल्या दोघांना एएनआयच्या ताब्यात दिले जाणार आहे. अटकेतील दोघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ताब्यातील दोघा जणांकडून हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी काय खुलासा होतो याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या वाहनाचे मालक मनसुख हिरेन होते. या घटनेनंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत रेतीबंदर भागात सापडला होता. जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आढळून आल्यानंतर मृत्यूपुर्वी हिरेन पोलिसात दाखल झाले होते. आपले वाहन चोरीला गेले असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता.