मुंबई क्राईम ब्रॅंच मधे 65 मुदतपूर्व बदल्या

राज्यात बदली रॅकेटबाबत आरोपांची चर्चा सुरु असतांना मुंबई क्राईम ब्रॅंच मधे एका रात्रीतून नुतन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 80 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी वर्गाचे बदली आदेश काढले आहेत. या बदल्यांमधे क्राईम ब्रॅंचच्या 65 जणांचा समावेश आहे. क्राईम ब्रॅंच मधील अधिका-यांची यात सर्वाधिक संख्या आहे.

डॉन रवी पुजारी यास अटक करणारे अजय सावंत, डॉन एजाज लकडावाला याला अटक करणारे सचिन कदम, आयपीएल स्पॉट फिक्सिंग केसचा गुंता सोडवणारे नंदकुमार गोपाळे यांचा या बदल्यांमधे समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व अधिका-यांना स्थानिक पोलीस स्टेशन अथवा दुय्यम पोस्टिंगवर टाकण्यात आले आहे.
निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे पोलिस दलाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. वाझे ज्या सीआययुचे प्रमुख होते त्या युनीटमधील बहुसंख्य अधिकारी बदलण्यात आले आहेत. ज्या अधिका-यांची बदली करण्यात आली आहे त्या अधिका-यांची चांगली प्रतिमा असल्याचे देखील म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here