जळगाव : राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विलास डिगंबर ताठे (कुंभारखेडा-रावेर) यांना ‘समाजभूषण पुरस्कार 2020-21’ दिला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी दिली आहे. विलास ताठे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.