जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कारवाईकामी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर चोरी करणारे दोघे तडीपार आरोपी चोरीच्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
प्रविण ऊर्फ मनोज रमेश भालेराव व त्याचा साथीदार पप्पु ऊर्फ मुकेश रमेश शिरसाठ दोघे रा.पिंप्राळा हुडको बौध्द वसाहत,जळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चोरीच्या ट्रॅक्टरची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याचा रंग बदलला होता.दोघा आरोपींना जळगाव शहारातील बी.जे.मार्केट परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुनिल पंडीत दामोदरे, पो.हे.कॉ. जयंत भानुदास चौधरी, पो.ना. विजय शामराव पाटील, पो.कॉ. सचिन प्रकाश महाजन, पो.कॉ. पंकज रामचंद्र शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.