प्रसिद्ध उद्योगपती मुकेश व अनिल अंबानी या दोघा बंधूंवर सेबीकडून कारवाई करण्यात आली आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी तसेच अनिल अंबानी व त्यांची पत्नी टीना अंबानी यांना सेबीने 25 कोटी रुपयांचा दंड केला आहे. 21 वर्ष एका जुन्या प्रकरणात अंबानी परिवारावर सदर कारवाई करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर पाच टक्के मर्यादेपेक्षा विकत घेतल्याने व त्याची माहीती सेबीला दिली नाही म्हणून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी सेबीकडून 85 पानी आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या प्रवर्तकांकडून कंपनीच्या भागीदारीबाबत सेबीला योग्य ती माहिती दिली नव्हती. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये भागीदार असलेले मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी तसेच अनिल अंबानी व त्यांच्या पत्नी टीना अंबानी या चौघांवर सेबीने कारवाई केली आहे. याशिवाय के. डी. अंबानी आणि परिवारातील इतर सदस्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.