औरंगाबाद : औरंगाबाद येथे बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची हात कापून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सकाळी साडेसात वाजता मनपा मुख्यालयानजीक मुस्लिम कब्रस्थानात घडलेल्या या प्रकाराने खळबळ माजली आहे. हत्या करण्यात आलेल्या या तरुणाची आज परिक्षा होती. विकास देवीचंद चव्हाण (23), रा.पाथर्डी, जि. अहमदनगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कब्रस्तानात आलेल्या काही नागरिकांना विकास चव्हाण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती लागलीचे पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलिस निरक्षक संभाजी पवार, श्वान पथक, फॉरेन्सिक टीमने तातडीने घटनस्थळ गाठत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मयताच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. तसेच त्याचा एक हात कोपरापासून कापण्यात आला आहे.