गादीभांडार चालक अटकेत – गादीत कापसाऐवजी वापरलेले मास्क

जळगाव : झोपण्याच्या गादीत कापसाऐवजी चक्क लोकांनी वापरलेले मास्क भरण्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील कुसुंबा गावी उघडकीस आली आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर गादी भांडार चालकास रितसर कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. गादीत कापसाऐवजी चक्क लोकांनी वापरलेले मास्क वापरल्यामुळे हा कोरोना विषाणूचा फैलाव करण्यास हातभार लावण्याचा निंदनीय प्रकार उघड झाला. अमजद अहमद मन्सुरी  असे अटकेतील गादी भांडार चालक आरोपीचे नाव आहे.

आज सकाळी कुसुंबा नाक्याजवळ असलेल्या हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे विषाणूचा फैलाव करणा-या या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर  कुसुंबा गावचे पोलिस पाटील राधेशाम चौधरी यांनी या प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यावेळी पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर, शांताराम पाटील आदी पोलिस कर्मचारी गस्तीदरम्यान नाकाबंदी व विनामास्क व जमावबंदीच्या केसेस करत होते. या प्रकाराची ड्युटीवरील दोघा कर्मचा-यांना खात्री करण्यासाठी रवाना करण्यात आले. दुपारी बारा वाजेच्या वेळी महाराष्ट्र गादी भांडार या ठिकाणी हा खळबळजनक प्रकार सर्रासपणे सुरु होता. लोकांनी वापरुन फेकून दिलेले मास्क गाद्यांमधे भरण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरु होते. त्याला ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. स्वत:च्या फायद्यासाठी लोकांनी वापरुन फेकेलेले मास्क गादीत कापुस भरण्याऐवजी वापरण्याची घटना अशा प्रकारे उघडकीस आली. अमजद अहमद मन्सुरी याला अटक करण्यात आली. पो.कॉ.सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमजद विरुद्ध त्याच्याविरुद्ध भा.द.वि. 188, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here