पुणे : सध्या कोरोना या विषाणूने धुमाकुळ घातला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे अनेक डॉक्टर देखील सध्या धुमाकुळ घालत आहेत. पुणे जिल्ह्यात चक्क एक बारावी पास झालेला बोगस डॉक्टर कोरोना बाधित रुग्णांवर दवाखाना थाटून उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे महमुद शेख नावाचा बारावी शिकलेला हा बोगस डॉक्टर आहे. 22 कोरोनाबाधीत रुग्णांच्या जिवीताशी खेळणारा हा डॉक्टर महेश पाटील या नावाने मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चालवत होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच त्याच्यावर छापा टाकत त्याचा पर्दापाश केला. तो फोनवर बोलतांना नेहमी हिंदीत फुफा, अम्मी, अब्बु अशा नावांचा वापर करुन बोलत असे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना त्याच्या वागण्यासह बोलण्यावर संशय आला. काही नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला.