जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनला गेल्या 4 ते 5 वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांची यादी पोलिस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर नागरिकांसाठी लावण्यात आली आहे. त्यात वाहनाचा क्रमांका, चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांकासह तपशील नमुद करण्यात आला आहे. ज्या वाहन धारक नागरिकांची वाहने असतील त्यांनी ओळख पटवून ती घेवून जाण्याचे आवाहन शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी केले आहे. वाहनाच्या मालकी हक्काबाबत मुळ दस्तावेज 19 एप्रिलपर्यंतच्या मुदतीत सादर करायची आहेत. या मुदतीत वाहनाबद्दल मालकी हक्क सांगण्यास दस्तावेजासह कुणी आले नाही तर त्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मुल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर सक्षम अधिका-याकडून कायदेशीर लिलावाची परवानगी घेतल्यानंतर सदर वाहनांच्या लिलावाची रक्कम शासन दरबारी जमा करण्यात येणार आहे.