प्रवासी रेल्वे सुरु राहतील – रेल्वे मंत्रालयाची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : सर्व प्रवासी रेल्वे गाड्या नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. प्रवाशांनी घाबरण्याची किंवा तर्क वितर्क करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी कन्फर्म तिकीट आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे गरजेचे आहे. आरक्षीत तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर यावे असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कडक निर्बंध सुरु असताना दिल्लीत देखील सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर काही राज्यात निर्बंध असले तरी रेल्वे सेवा सुरु राहणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here