जळगाव : एलसीबी व एमआयडीसी पोलिसांच्या धडक कारवाईत आज गावठी हातभट्टी निर्मीती करणा-या विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत गावठी दारु निर्मिती करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कंजरवाडा, जाखणी नगर, तांबापूर खदान, सिंगापूर या ठिकाणी धाडी टाकून रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. यात बेबीबाई भारत बाटुंगे (46) रा. तांबापुरा जळगाव, प्रेमाबाई गजमल कंजर (51) रा. जाखनी नगर जळगाव, नीलमबाई गोपाळ बाटुंगे (30) रा. तांबापुरा खदान जळगाव, मुन्नीबाई देविदास बागडे (40) तांबापुरा खदान जळगाव यांच्या कब्जातून अनुक्रमे 10950, 12000, 12500 व 18500 रुपयांचे रसायन हस्तगत करत नष्ट करण्यात आले. चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुंबई प्रॉव्हिबिशन कलम (65 (ख) , (ड ), (इ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र पाटील, संजय पवार, हे.कॉ. अनिल जाधव, अनिल इंगळे, प्रदीप पाटील, अनिल देशमुख, वसंत लिंगायत, गोरख बागुल, सुरज पाटील, पोलिस नाईक प्रवीण मांडोळे, पो.कॉ. सचिन महाजन, परेश महाजन, वैशाली सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत पो.नि. विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली गावठी दारुची निर्मीती व विक्री करणारे राखी राजु गुमाने, रेखा सुर्यभान कंजर, आशा सुनिल बाटुंगे, रिना धर्मा गुमाने, बिजनाबाई राजु बाटुंगे आदीविरुद्ध पाच गुन्हे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले. या कारवाईत 132500 रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. या कारवाईत एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकातील विठ्ठल ससे, स.पो.नि. अनिल मोरे, पोलिस उप निरीक्षक विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, पो.हे.कॉ. राजेंद्र सैंदाणे, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, पो.कॉ. सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, सतिष गर्जे, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, महिला पोलिस नाईक निलोफर सैय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाळ व होमगार्ड आदींनी सहभाग घेतला.