2 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह नायजेरियन आरोपी मुंबई आरपीएफच्या जवानांनाच्या ताब्यात

आरोपी व मुद्देमालासह तपास पथक

मुंबई :  सुमारे दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज संशयीतासह मुंबई आरपीएफ जवानांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि शिवाजी पवार, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आरपीएफ अंतर्गत 7 जुलै रोजी निलाजे आणि तळोजा (नवी मुंबई) दरम्यान खांब क्रमांक कि.मी. 56 येथे ड्युटी बजावत होते.

आरोपी

दरम्यान नवी दिल्ली एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस या गाडीने प्रवास करणारा संशयीत नायजेरीयन नागरीक धावत्या रेल्वेची चेन ओढून पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेत आरपीएफ ठाणे दिवा येथे आणले गेले. त्याची झडती व चौकशी करण्यात आली. त्याचे नाव  आणि चौकशी केली असता त्याने आपले नाव सनी ओचा आयवायके (वय 41) राहणार नायजेरिया असे आढळून आले.

त्याचा पासपोर्ट क्रमांक ए 10059012 असा आहे. एसी थ्री टायरने प्रवास करणा-या संशयीताचे रेल्वेचे तिकिट पीएनआर क्रमांक 2310186539 असे होते.

त्याच्या बॅगची तपासणी केली असता आरपीएफ जवानांना एक संशयास्पद पदार्थ सापडला. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा कमांडंट, मध्य रेल्वेने नारकोटिक कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), मुंबई यांच्याशी समन्वय साधला आणि त्यांची मदत घेतली.

तपास पथकासह तज्ज्ञांसह आरपीएफ ठाणे दिवा येथे आले. त्यांनी पदार्थाची तपासणी केली. तो मादक पदार्थ अल्फामेटामाईन्स नावाचा 2.300 किलो वजनाचा होता. या तपासकामी आरपीएफ जवानंचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here