जळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी एक पथक स्थापन केले होते. या पथकाने केलेल्या तपासात दोघे दुचाकीस्वार गळाला लागले असुन त्यांच्याकडून चोरीच्या तिन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ब्राम्हणे ता.एरंडोल येथील प्रविण संभाजी पाटील हा तरुण जळगाव जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याला सापळा रचुन पाळधी गावानजीक महामार्गावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार सागर सुभाष धनगर याला देखील ताब्यात घेण्यात आले. दोघा मोटारसायकल चोरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एरंडोल, पारोळा व यावल पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून तिन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. प्रविण संभाजी पाटील (30) रा.ब्राम्हणे ता.एरंडोल जि.जळगाव व सागर सुभाष धनगर (22) रा.निमगाव ता.यावल या दोघांना पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील, चालक पो.हे.कॉ.राजेंद्र पवार, भारत पाटील यांनी सहभाग घेतला होता.