पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन

जळगाव : जळगाव येथील रतनलाल सी. बाफना जैन स्वाध्याय भवनात आज 11 मे पासून 18 ते 44 वयोटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्य शासन, मनपा, भंवरलाल अ‍ॅंड कांताबाई जैन फाऊंडेशन, सकल जैन श्री संघ जळगावच्या वतीने या लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, माजी खा. इश्वरलाल जैन, माणकचंद बैद, कस्तुरचंद बाफना, जैन उद्योग समुहाचे अतुलजी जैन, नगरसेवक नितीन लढ्ढा, रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी आदींची यावेळी उपस्थिती होती. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात याठिकाणी लसीकरण केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here