कॅमेरामन, पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करण्याची मागणी

On: May 12, 2021 2:13 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्री, नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील प्रसार माध्यमांचे सर्व पत्रकार व कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात देखील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर करावे असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. परवा राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन देखील केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत राज्य अनेक पत्रकारांना मुकले आहे. अशा प्रसंगी पत्रकारांच्या सुरक्षेसह जिविताची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे फडणविसांनी पत्रात म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील पत्रकार व कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment