जळगाव मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस दल सज्ज

On: January 2, 2026 8:04 AM

जळगाव – जळगांव शहर महानगरपालिका निवडणुक २०२६ करीता जळगांव शहर मध्ये १९ प्रभाग मध्ये एकूण ७५ नगरसेवक पदाकरीता एकूण १६९ मतदान केंद्रावर ५१६ बुध असे नियोजित करण्यात आले असून त्या अनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था आबाधित व निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी शस्त्र परवाना धारक इसमांकडून एकूण २५१ शस्त्र जप्त करण्यात आलेली आहे.

तसेच जळगांव शहरातुन उपद्रवी असलेले तसेच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले ९८ ईसम यांना निवडणुक कालावधीत हद्दपार करण्याचे प्रस्तावित असुन ७८ ईसमांविरुध्दचा हद्दपार प्रस्ताव मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगांव यांचेकडे सादर करण्यात आला आहे. तसेच काही उपद्रवी ईसम यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४९ अन्वये १५० इसमांना नोटीस देण्याचे प्रस्तावित असुन ६१ लोकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत,

तसेच नमुद निवडणुकीचे अनुषंगाने ०९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६० सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक, १०७० पुरुष पोलीस अंमलदार, १३७ महिला पोलीस अंमलदार, ०८ दंगा नियंत्रण पथके, ०२ शिघ्र प्रतिसाद दल, ०१ एसआरपीएफ कंपनी, ११०० होमगार्डस असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment