जळगाव दौ-यात फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

On: July 8, 2020 10:36 PM

जळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौ-यावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते राज्यभर दौरा करत आहेत. आज सायंकाळी नाशिकचा दौरा आटोपून ते जळगावला दाखल झाले.

ताफ्यातील वाहनाला नाशिराबादला अपघात झाला. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना किरकोळ इजा झाली.

फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनांचे ब्रेक निकामी होऊन वाहनांची एकमेकांना धडक लागली. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराचे सांत्वन करून ते भालोदहून जळगावला परतत होते. वाटेत हा अपघात झाला.

ताफ्यातील एका वाहनाने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. दरेकर यांना देखील किरकोळ दुखापत झाली.

आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोविड रूग्णालयाला त्यांनी भेट दिली होती.वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर ते जळगावात दाखल झाले. जळगावला उद्या त्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन कोरोना विषाणूच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment