म्हैस दोन वेळा दूध देते – कृपाशंकर सिंग

On: May 13, 2021 11:56 AM

मुंबई : म्हैस दिवसातून दोन वेळा दूध देत असते. हे ताजे दूध सर्व दुकानदारांना वितरीत केले जाते. असे असले तरी कोणताही रिटेलर सायंकाळी दूध घेत नाही. याचे कारण म्हणजे सायंकाळी दुकाने बंद असतात. त्यामुळे सरकारने सायंकाळी देखील दूध विक्रीला परवानगी देण्याची मागणी उत्तर भारतीय समाजाचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दूध उत्पादक घटकाकडे कृपाशंकर सिंग यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की म्हैस दिवसातून दोन वेळा दूध देत असते आणि हे ताजे दूध सर्व दुकानदारांना वितरीत केले जात असते. त्यासाठी सायंकाळी देखील दूध विक्रीला परवानगी दिली जावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment