नवी दिल्ली : कोरोनासोबत लढा देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिका-यांना मोकळीक दिली आहे. तुम्हाला जे काही करायचे ते करा माझ्या बाजूने तुम्हाला पुर्णपणे मोकळीक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिका-यांना संबोधीत करतांना म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील काही राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिसीच्या माध्यमातून संवाद साधत अधिकारी वर्गाला काही टिप्स देखील दिल्या. जिल्हा पातळीवर आपल्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ती त्यांनी घ्यावीत असे म्हणत सर्व अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी वर्गाला दिल्या. आपल्या देशात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आव्हाने आहेत. जिल्ह्याच्या आव्हानांची माहिती प्रत्येक संबंधीत जिल्हाधिका-यास माहिती असतात. ज्यावेळी एखादा जिल्हा जिंकतो त्यावेळी पुर्ण देश जिंकतो असे म्हणत आता पंतप्रधाना मोदी यांनी कोरोनाच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना सोपवले आहेत.