जनसामान्यांसाठी धाव घेणारे सचिन सोमवंशी

On: May 22, 2021 11:06 AM

पाचोरा : कॉंग्रेस पक्षाचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सध्या मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टीव्ह मोड मधे आलेले आहेत. कॉंग्रेस पक्ष हा मुळातच जनसामान्यांसाठी वाहून घेतलेला पक्ष असल्याचे सचिन सोमवंशी नेहमी सांगत असतात. त्यामुळे पाचोरा तालुक्याचे सुपुत्र असलेले सचिन सोमवंशी नेहमीच कार्यतत्पर असतात. पाचोरा तालुक्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची एक चांगली फळी तयार केली आहे. त्या फळीच्या आधारे त्यांची वाटचाल नव्हे तर घौडदौड सुरु आहे. यामुळे सचिन सोमवंशी यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून पाचोरा तालुकावासीय त्यांच्याकडे भावी आमदाराच्या भुमिकेत बघत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात जनसामान्यांना कोरोनाची लस मिळतांना आलेल्या अडचणी त्यांनी धाव घेत सोडवली. त्यासोबतच पाचोरा तालुक्यातील लोहटार आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणा-या तारखेडा उप केंद्रात एनआरएचएम अतंर्गत दुरुस्ती चे साडे चार लाख रुपयाचे काम सध्या सुरु असतांना याठिकाणी केवळ रंगकाम झालेले आहे. संबंधित ठेकेदाराने आपल्या मनमानी कारभारामुळे कामाचे अडगळ सामान तेथेच ठेवल्याची व संबंधित कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाल्याचे समजताच सचिन सोमवंशी आक्रमक झाले. त्यांनी कडाक्याच्या उन्हात त्या ठिकाणी आपल्या समर्थकांसह धाव घेतली.

या केंद्रात त्यांना मोठ्या प्रमाणात समस्या दिसून आल्या. एकाच कामावर दोन वेळा पैसे खर्च करुनही कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे सचिन सोमवंशी यांचा पारा भडकला. त्यांनी तात्काळ शाखा अभियंता भावसार यांना कॉल करुन उपकेंद्रांचे काम तात्काळ करण्यासह ठेकेदाराचा अडगळ सामान काढण्याची सुचना केली. यावेळी कॉग्रेस पदाधिकारी गणेश पाटील, धनंजय पाटील, राहुल शिंदे, भारत पाटील ग्रामस्थ जगदीश पाटील, महेश गोसावी आदी उपस्थित होते.

पाचोरा कॉग्रेस कमिटीने स्व. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अ‍ॅड. अण्णासाहेब भोईटे, युवक विधानसभा उपाध्यक्ष शकील शेख, महिला वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मनिषा पवार, लक्ष्मण पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, सचिन सोमवंशी यांनी स्व. सातव यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment