रुग्ण आणि मृतांच्या संख्येनुसार जिल्ह्यांमधे शिथीलता – राजेश टोपे

On: May 23, 2021 12:01 PM

कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या ज्याप्रमाणात कमी असेल त्याप्रमाणात प्रत्येक जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधामधे 1 जून नंतर शिथीलता दिली जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र ही शिथीलता टप्प्याटप्याने दिली जाणार आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या संकेताने राज्यातील विशेषत: ज्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या कमी प्रमाणात आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने पावले उचलली जात आहे. मात्र लसीकरणाचा वेग वाढवण्या आला पाहिजे अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्वच नागरिकांची आहे. लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे कोरोनासोबत झुंज द्यायची कशी हा मोठा प्रश्न असल्याचे लोक बोलत आहेत. शासन एकीकडे लसीकरण करुन घेण्याचा सल्ला देत असतांना दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा विरोधाभास संपायला हवा असे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment