मुंबई : राज्यातील अठरा जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. होम आयसोलेशन मधील कोरोना रुग्ण सुपर स्प्रेडर म्हणून फिरत असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. अशा रुग्णांना आता थेट कोविड सेंटरमधेच दाखल व्हावे लागणार आहे. या अठरा जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांसमवेत बैठकीत उप मुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर अशी या अठरा जिल्ह्यांची नावे आहेत. या जिल्ह्यातील होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांना आता थेट कोविड सेंटरमध्ये भरती व्हावे लागणार आहे.