दोन लाखासाठी आकाशने दाबला आजीचा गळा !
हातात पोलिस बेडी पडता फुलवला जेलचा मळा !!
नाशिक : सिन्नर येथील आकाश सुभाष जगताप, आकाश बाळासाहेब शिरसाठ व अजय शिवाजी ताकतोंडे हे तिघे गुन्हेगारी वृत्तीचे मित्र आहेत. आकाश जगताप याच्यावर सायखेडा पोलिस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल आहे. आकाश बाळासाहेब शिरसाठ याच्यावर सिन्नर पोलिस स्टेशनला घरफोडीसह चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा मित्र अजय शिवाजी ताकतोंडे हा देखील एक गुन्हेगारी वृत्तीचा तरुण आहे. तिघे मित्र सोबत आले म्हणजे त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याचे नियोजन होत असते.
याकामी 25 फेब्रुवारी रोजी त्याने त्याचे साथीदार आकाश शिरसाठ व अजय ताकतोंडे यांना हाताशी घेतले. आपल्याला आजीकडून पैसे आणायचे आहेत असे त्याने दोघांना सांगितले. त्यानुसार मध्यरात्री तिघे मित्र स्प्लेंडर मोटार सायकलने ट्रिपल सिट सिन्नर येथून आजीच्या घराकडे लासलगाव
– चांदवड मार्गे जळगाव निंबायती गावाकडे गेले. वाटेत
त्यानी मद्यपान केले. दरम्यान त्यांनी एके
ठिकाणी शेकोटी पेटवून पुन्हा एकदा आपले नियोजन पक्के केले. त्यानंतर तिघे जण आकाशच्या
आजीकडे गेले. सुरुवातीला आकाश जगताप याने त्याची
आजी कमलाबाईला हाक मारुन बाहेर बोलावले. आजी मला पैसे दे असे म्हणत तो तिच्याकडे पैशांची मागणी करु लागला.
आपला नातू किती गुणाचा आहे आणि तो या पैशांचे काय करणार आहे हे तिला चांगल्या प्रकारे
ठावुक होते. त्यामुळे तिने बाहेर येत नातवाला आपल्या ताब्यातील पैसे देण्यास नकार दिला.

आजीजवळ दोन
लाखाची रोकड असल्याची नातू आकाश यास बिनचूक माहिती होती.त्यानुसार
तो आजीकडे पैसे मागण्याचा हट्ट करु लागला. आजी पैसे देत नसल्याचे बघून नातू आकाश जगताप
याने संतापाच्या भरात आजीचा दोरीने गळा आवळला. वयोवृद्ध आजीचा वयोमानाने प्रतिकार कमी
पडला होता. दरम्यान त्याच्या इतर दोघा साथीदारांनी मिळून आजीचे हात पाय धरुन ठेवले.
शेवटी आकाश जगतापची आजी कमलाबाईने आपला जिव सोडला. आजी मरण पावताच आकाश जगतापने आजीच्या
घरातील दोन लाखाची रोकड हस्तगत केली. मयत आजीला तशाच अवस्थेत सोडून तिघांनी तेथून पोबारा
करत सिन्नर गाठले. सिन्नरला गेल्यावर आकाश जगताप याने आकाश शिरसाठ यास 15 हजार रुपये
तर अजय ताकतोंडे यास 10 हजार रुपये दिले. त्यानंतर
आकाश जगताप एकटाच पुणे येथे मौजमजा करण्यासाठी निघून गेला. पुणे येथून त्याने भिवंडी
गाठले.

दुसरा दिवस उजाडला. दुपार झाली तरी आजी
कमलाबाई झोपेतून उठत का नाही ? असा प्रश्न
आजुबाजूच्या रहिवाशांना पडला. त्यांनी जवळ जावून पाहीले असता कमलाबाईंचा दोरीने गळा
आवळून खून झाल्याचे उघडकीस आले. त्या मयत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या घटनेची माहिती
मयत कमलाबाईचा सिन्नर येथील मुलगा सुभाष जगताप यास देण्यात आली. या घटनेची माहीती मिळताच
कमलाबाई यांचा मुलगा सुभाष जगताप हा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेची माहिती मिळताच
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग,
अप्पर पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.के.पाटील
यांनी यांनी आपल्या अधिकारी – कर्मचारी वर्गासह
घटनास्थळ गाठले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस
निरिक्षक के.के. पाटील यांनी या घटनेचा समांतर तपास सुरु केला. या प्रकरणी मालेगाव
तालुका पोलिसात सुभाष जगताप यांच्या फिर्यादीनुसार गु.र.न. 67/20 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात
आला.

तपासा दरम्यान घटनेच्या
काही दिवसांपूर्वी मयत
कमलाबाई तिच्या मुलाकडे सिन्नर येथे गेली होती.
कमलाबाईच्या सिन्नर येथील नातेवाईकांकडे
चौकशी केली असता, तिचा नातु आकाश जगताप हा घटना घडल्यापासुन सिन्नर येथून
बेपत्ता झालेला होता. तो तिच्या अंत्ययात्रेत देखील नव्हता. त्यानुसार पोलिस पथकाने
त्याच्यावर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली.

त्याचे लोकेशन घेत त्याला ठाणे जिल्ह्यातील
कसारा येथुन ताब्यात घेण्यात आले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपला
गुन्हा कबुल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे सिन्नर येथील साथीदार आकाश बाळासाहेब
शिरसाठ व अजय शिवाजी ताकतोंडे यांची नावे पुढे आली. त्यांना ते काम करत असलेल्या सिन्नर
एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनीदेखील आपला गुन्हा कबुल केला. तिघांना
न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी सविस्तर हकिकत पोलिसांजवळ कथन केली.

कमलाबाई जगताप ही गेल्या काही दिवसांपुर्वी तिचा मोठा मुलगा सुभाष जगताप याचे घरी सिन्नर येथे गेलेली होती. त्यावेळी तिच्याजवळ
तिच्या मालकीचे सिन्नर येथील जुने घर विकल्याचे दोन लाख रूपये होते. त्यानंतर ती सिन्नर येथुन पुन्हा जळगाव निंबायती, ता.मालेगाव येथे आपल्या
घरी परत आली होती.तिचा नातू आकाश जगताप यास आजीजवळ पैसे असल्याची
परिपुर्ण माहिती होती. त्याप्रमाणे त्याने त्याचे सिन्नर येथील साथीदार आकाश शिरसाठ व अजय ताकतोंडे यांना
आजीकडून पैसे आणण्याचा प्लॅन सांगितला.

25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री
तिघेही सिन्नर येथुन स्लेंडर मोटर सायकलने जळगाव निंबायती येथे गेले. तेथे आकाश जगताप याने त्याच्या आजीला आवाज देवून
बोलावले. आजी मला पैसे दे असे बोलुन त्याने
तिला पैशांची मागणी केली. त्यावर आजीने पैसे देण्यास नकार दिला. याचा नातू
आकाश जगताप यास राग आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी आजीचा दोरीने गळा आवळून जिवे ठार मारले व घरातुन पैसे घेत
त्यांनी तेथून पळ काढत सिन्नर गाठले. दुस–या दिवशी आरोपी आकाश जगताप याने त्याचे साथीदार आकाश शिरसाठ यास पंधरा हजार व अजय ताकतोंडे यास दहा हजार रूपये देवुन तो पुणे येथे निघुन गेला.

या गुन्ह्याच्या तपासकामी नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सपोनि अनिल वाघ, सपोनि संदिप दुनगहु, सहायक फौजदार प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, पोलिस नाईक प्रितम लोखंडे, देवा गोविंद, चेतन संवत्सरकर, पो.कॉ. निलेश कातकाडे, किरण काकड, संदिप लगड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, रतिलाल वाघ, प्रदिप राठोड यांच्या पथकाने या
खुनाच्या गुन्हयातील तिघा
आरोपींना ताब्यात घेत
गुन्हा उघडकीस आणला.