पब्जीच्या आहारी गेला, जिव गमावून बसला

On: July 9, 2020 5:49 PM

नागपूर : पब्जीच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उप राजधानी नागपुरात घडली आहे. रितिक किशोर ढेंगे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईन जवळ राहत होता.

रितीकचे वडील एका शिक्षण संस्थेत नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी रितिक रात्रंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त राहायचा. वडिलांनी त्याला समजवण्याचा खुप वेळा प्रयत्न केला.

मात्र तो कुणाचे ऐकत नव्हता. पबजीच्या आहारी गेलेल्या रितिकचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होवू लागले. त्यामुळे त्याला भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. पब्जी खेळला नाही तर तो असामान्य मुलांसारखा वागत होता.

त्याच्या या त्रासामुळे ढेंगे कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रितीकने घरात गळफास लावून घेत आपली जिवनयात्रा संपुष्टात आणली.

लोक हे देखील बगतात विकास दुबे आणि आजची फिल्मी गुन्हेगारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment