विकास दुबे आणि आजची फिल्मी गुन्हेगारी

vikas dube

फार पुर्वी चंबळ खो-यातील दरोडेखोर हातात दुनाली बंदुका घेवून घोड्यावरुन येत असत. प्रतिस्पर्ध्यांना सरळ सरळ गोळ्या घालून मारत असल्याची दृश्ये चित्रपटांनी गाजवली आहेत. दरोडेखोरांची टोळी युद्धेही राज्यात गाजली आहेत.

मुंबईतील गुन्हेगारांची टोळी युद्धे दोन पिढ्यांनी पाहिली आहेतच. प्रचंड संपत्ती कमवण्यासोबतच आपल्या इलाक्यात (कार्यक्षेत्रात) वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होणारा खून खराबा “विकास दुबे” प्रकरणाने पुन्हा एकदा जनतेसममोर आला आहे. आठ पोलिसांची हत्या प्रकरणाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसह पाच ते सात राज्ये ढवळून निघाली आहेत. या घटनेच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसते.

“विकास दुबे” नामक गुंडाने राजकारणासह गुन्हेगारीतही पाय रोवले होते. स्वत:ची “क्रुरकर्मा” व “मददगार” अशी प्रतिमा निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केल्याच्या कथा आता बाहेर येवू लागल्या आहेत. उ.प्र.चे विद्यमान मुख्यमंत्री योगीराज, माजी मुख्यमंत्री स.पा.नेते मुलायमसिंग, मायावती, विधानसभेचे एक माजी सभापती याशिवाय काही राजकीय नेत्यांचे याला आशिर्वाद लाभले होते.

तशी छायाचित्रे सोशल मिडीयावर झळकली आहेत. आज गुन्हेगार म्हणून उल्लेख होत असलेल्या विकास दुबेने आठ पोलिसांची हत्या घडवली आहे. या हत्येपुर्वी विविध पदावरील सुमारे दोनशे पोलिस विकास दुबेच्या संपर्कात होते असे म्हटले जात आहे.

गुन्हेगार व राजकारणी यांचे संबंध शोधण्यासाठी व्होरा समिती नेमली होती. या समितीचा अहवाल धुळ खात पडून असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महासंचालक जे.एफ.रिबेरो यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांना पोलिस खात्यात करावयाच्या सुधारणांची यादी पाठवली होती.

एवढेच नव्हे तर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना खरच पोलिस खात्यात सुधारणा करायच्या आहेत काय? असा जाहीर प्रश्न देखील विचारला होता. पोलिस खाते आणि भ्रष्टाचार ही नाण्याची एकच बाजू असल्याची टीका यापुर्वी अनेक वेळा झाली आहे.

सारेच तसे नसले तरी काही टक्के लोकांची भ्रष्ट प्रतिमा पोलिस खात्याची प्रतिमा डागाळण्याचे काम करते. सध्या राज्यात कोणताही पोलिस पैशाशिवाय राहू शकत नाही असा दोन पोलिसांमधील संवाद गाजतोय. त्यात संबंधीतांना निलंबीत करण्यात आले आहे.

हे देखील लोक वाचतात केईएमचा डॉक्टर अडकला हनी ट्रॅपमधे

राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावरील दहशतवाद्यांविरुद्धचे खटले लढलेले – जिंकलेले सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी भारतातील 130 कोटी जनसमुदायाला मौलीक मार्गदर्शन केले आहे. बॉलीवुड मधून गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा प्रकार थांबवला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. समाजात समाजसेवक म्हणून जनतेसमोर येणारे सर्वच लोक तसे नसतात.

काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अवैधपणे मिळवलेल्या संपत्तीपैकी काही थोडासाच भाग लोकांना दानधर्म म्हणून वाटप करत असल्याचा देखावा करतात. त्यांना समाजसेवक समजण्याची चुक आपणाकडून केली जाते. या अचूक वर्मावर त्यांनी बोट ठेवले आहे. याचा दुसरा अर्थ काही धुर्त सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवणारे काही लोक अवैध मिळकतीतून थोडासा भाग गोरगरीबांना वाटपाचा कार्यक्रम करतात.

त्याची मोठी प्रसिद्धी करतात. त्यातूनच काही गुन्हेगार राजकारणात पदार्पण करतात. अनेक राज्यात अनेक गुन्हेगारांनी नगरसेवकापासून मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे.  “वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई” या हिंदी चित्रपटात राजकारण प्रवेशाचा राजमार्ग दाखवला आहे. कोणताही राजकारणी त्याची वडीलोपार्जीत शेती विकून दानधर्म करत नाही. हेच सुत्र जनतेने लक्षात घेतले पाहिजे.

ते आधी लुटतात आणि लुटीतील अल्प स्वल्प भाग वाटतात. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील विविध पदे गाठण्याचा प्रयत्न करतात. ख-या समाजसेवकांवर अशा काही ढोंगी समाजसेवकांनी कब्जा केला आहे. स्वत:ला बहुजन नेते, विकास पुरुष, लोहपुरुष, भाग्यविधाते, विकासाचे महामेरु म्हणवणा-या नेत्यांची मोठमोठी कटआऊट दिसतात. कटआऊट वर झळकणा-या काही नेत्यांची खरच तेवढ्या उंचीची पात्रता आहे काय? याचा समाजाने विचार करायला हवा.

गुन्हे आणि गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्ती यांचे समर्थन होवू शकत नाही हे बोलण्यासाठी ठिक आहे. परंतू बॉलीवुड किंवा टीव्हीच्या छोट्या पदद्यावर आमची नवी पिढी-उमलती पिढी(वय 10 ते 20 वर्ष) हातात चाकू, सुरे, तलवारी, बंदुका, मशिनगन, हॅंड ग्रेनेड, बॉंब फेकणारे फिल्मी हिरो बघते तेव्हा त्यांच्या मनावर काय प्रतिबिंब उमटेल याचा विचार कुणी करायचा?

सुभाष वाघ (पत्रकार)

8805667750

विकास दुबे अटक बघा विडियो

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here