देवेंद्र फडणवीस थेट एकनाथराव खडसेंच्या निवासस्थानी

On: June 1, 2021 12:31 PM

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगर दौ-यावर आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी गिरिष महाजन यांच्या समवेत एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. या हजेरीत त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.

कालच फडणवीस यांनी शरद पवार याच्या तब्येतीची विचारपुस करण्याच्या निमीत्ताने भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली असल्याचे म्हटले जाते. आज त्यांनी मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर हजेरी लावत खा. रक्षा खडसे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यावेळी फडणवीस यांनी वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी देखील केली. काही दिवसांपुर्वी मुक्ताईनगर येथील भाजपच्या दहा आजी माजी नगरसेवकांनी सेनेत उडी घेतली. या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. वादळामुळे नुकसान झाल्याचा पाहणी दौरा म्हटला जात असला तरी चर्चा आणि गुफ्तगु मात्र राजकीय झाल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment