बोदवड येथील चोरीप्रकरणी चोरटा गजाआड

On: July 9, 2020 6:19 PM

बोदवड शहरातील रमेश जैन यांच्या मालकीचे शांती प्रोव्हिजन हे दुकान गेल्या महिन्यात चोरट्यांनी फोडले होते. या दुकानातून जवळपास तिस हजार रुपयांचा किराणा माल चोरीला गेला होता. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.

या चोरीप्रकरणी आरोपी रामदास उर्फ भुरा बाळू गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. स्वप्निल नाईक, सहायक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार रविंद्र पाटील, कमलाकर बागुल, विकास वाघ दिपक पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन व मुरलीधर बारी यांनी सहभाग घेतला.

लोक हे देखील वाचतात डी.ओ.पाटील हत्या प्रकरणातील आरोपी कार्तिक पोलिसांच्या जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment