डी.ओ.पाटील हत्या प्रकरणातील आरोपी कार्तिक पोलिसांच्या जाळ्यात

D.O.Patil

आरोपी कार्तिक

जळगाव : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या खून प्रकरणात सामिल असलेला कार्तिक जाधव यास इंदोर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कार्तिक उर्फ सुपड्या जाधव (24) यास अटक केली.

आरोपी कार्तिक हा हिस्ट्रीशीटर निलेश गुरचळचा मित्र होता. गुन्हा घडल्यानंतर तो इंदौर येथे फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. कार्तिकवर मध्यप्रदेशात भा.द.वि.  324 चे तीन तर भा.द.वि. 420 चा एक याशिवाय आर्म अॅक्ट व दारूबंदीचा गुन्हा नोंद आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर

पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके,जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बी.जी.रोहोम, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस  निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. या सापळ्यात सहाय्यक फौजदार माधवराव पाटील, हवालदार विजय पाटील, नरेंद्र वारूळे आदींच्या पथकाने सहभाग घेतला.

माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या हत्येप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य तेजराव पाटील, विलास महाजन, सैय्यद साबीर सैय्यद शफी, निलेश ईश्वर गुरचळ, अमोल मुरलीधर लवंगे या पाच आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. 

लोक हे देखील वाचतात मुक्ताईनगरच्या बॉर्डरवर झाला सुपारी मर्डर;तिनच दिवसात उभा झाला तपासाचा गर्डर
लोक हे देखील वाचतात पब्जीच्या आहारी गेला, जिव गमावून बसला
लोक हे देखील वाचतात विकास दुबे आणि आजची फिल्मी गुन्हेगारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here