फडणवीसांपाठोपाठ खडसेंची देखील पवारांच्या बंगल्यावर हजेरी

On: June 2, 2021 2:51 PM

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ आता माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोघा आजी व माजी विरोधी पक्ष नेत्यांनी मुरब्बी नेते शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय पटलावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी पवार व खडसे यांच्यासमवेत शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे देखील हजर होते.

शरद पवार यांच्या तिन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या निमित्ताने पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अनेक नेते मंडळी त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. या भेटीच्या निमित्ताने विचारपुस तबेतीची असली तरी चर्चा मात्र राजकारणाचीच होत आहे. खडसे व पवार यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर राजकीय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आला नसला तरी देखील ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment