सचिन सोमवंशी – गुलाबराव पाटील भेट

On: June 3, 2021 6:54 PM

पाचोरा : पाचोरा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडीचे प्रमुख ना. गुलाबराव पाटील यांची जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रामगृहात भेट घेतली.

या भेटीत सचिन सोमवंशी यांनी पाचोरा तालुक्याचा आढावा सादर केला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्याची लवकरच भेट घेणार असून त्यासाठी वेळ मागितली असल्याचे कारण सोमवंशी यांनी बोलतांना दिले. महाविकास आघाडीचे पालक असल्याने कॉग्रेस पदाधिका-यांची कामे तातडीने करण्याचे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी सोमवंशी यांना दिले. असे असले तरी भेटीचे खरे कारण गुलदस्त्यात असल्याचे म्हटले जात आहे. पाचोरा तालुक्यातील शिवसेना – कॉग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वरीष्ठ पातळीवरील भेटींना महत्व येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment