पाचोरा : इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोदी सरकारविरोधात पाचोरा कॉंग्रेसच्या वतीने मोटार सायकलला प्रतिकात्मक फाशी देत अनोखे आंदोलन करण्यात आले. पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. यावेळी गजानन पेट्रोल पंपाच्या शेजारी रस्त्यावरील झाडाला दोन मोटारसायकला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली.
याप्रसंगी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी.. मोदी सरकार हाय हाय.. सामान्य जनतेची हाय घेणार्या मोदी सरकार चा निषेध असो अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, जगदीश ठाकरे, शिवराम पाटील, शिला सुर्यवंशी, सागर वाघ, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, सागर पाटील, संदीप पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते.