मुंबई : 5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावलाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा महत्वाचा वेळ घेतल्याबद्दल जुहीस 20 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. आता जुही चावलाने याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधे तिने म्हटले आहे की आम्ही या तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून हे तंत्रज्ञान सुरक्षीत असल्याची आम्हाला हमी द्यावी.
जुही चावलाने व्हिडीओत म्हटले आहे की कृपया या 5G तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या मनातील भिती दुर करा. यावरील संशोधन सार्वजनीक करा. सदर प्रणाली गर्भवती मातांसाठी व गर्भातील बाळांसाठी सुरक्षीत आहे याची हमी द्यावी. एवढेच आम्हाला जाणून घ्यायचे आहे. जुहीची याचिका म्हणजे एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आलेला एक स्टंट असल्याचे न्यायालयाने म्हणत तिची याचिका फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करण्यापुर्वी तिने सरकारला याबाबतीत का विचारणा केली नाही? सरकारने तिचे म्हणणे ऐकले नाही काय? अशा विविध प्रश्नांचा भडीमार न्यायालयाने तिला केला होता.