लोहारा सुकी नदीच्या घाटात खड्ड्यांचे साम्राज्य

रावेर : रावेर तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघाताच्या घटना होत असून वाहनधारकांमधे संतापाची लाट उसळली आहे. घाटातील या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या दुर्दशेला जबाबदार लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिका-यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या रस्त्याला वेळीच दुरुस्त केले नाही तर जनता निवडणूकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे खुलेआम बोलले जात आहे.

रावेर तालुक्यातील लोहारा हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव आहे. या गावानजीक राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचे सुकी धरण आहे. सातपुडा जंगलातील सुकी धरण बघण्यासाठी पर्यटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्यामुळे या घाट परिसरात वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय शेतीकामानिमीत्त शेतकरी वर्गाची देखील लगबग सुरु असते. या खड्ड्यांमुळे या घाटात अनेकांचे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक वाहनधारक मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत. अपघाताच्या अशा वारंवार घडणा-या घटना लक्षात घेता संबंधीत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here