पाचोरा (प्रतिनिधी) : स्टेट बँकेच्या नियोजनाअभावी शेतक-यांना कर्जफेडीचे दाखले मिळण्यास उशीर होत आहे. ते दाखले लवकर मिळण्याची मागणी पाचोरा कॉंग्रेसतर्फे बॅंक अधिका-यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
भारतीय स्टेट बॅंकेने माहे डिसेंबर 2020 मध्ये कर्ज थकीत शेतक-यांसाठी ऋण समाधान नावाची योजना आणली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंक अधिका-यांनी विसपेक्षा अधिक शेतक-यांना बॅंकेत बचत खाते उघडण्यास सांगितले होते. या खात्यांमधे शेतक-यांची जवळपास पन्नास लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटून देखील शेतक-यांना कर्जफेडीचा दाखला मिळालेला नाही. त्यासाठी पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंक अधिकारी मच्छींद्र दुधल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इरफान मनियार, तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, खरे, युवक काँग्रेसचे ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक दुधल यांच्याशी चर्चा करण्यात आली. मॅनेजर दुधल यांनी शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मान्य केले. मात्र तांत्रीक टेक्निकल अडचणीमुळे विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉग्रेस पदाधिका-यांनी शेतकऱ्यांना लवकर कर्जफेडीचा दाखला न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.